समाजातील समतोल व सामजस्या करिता पोलीस व डॉक्टर यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज – पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील

Sep 29, 2019

नाशिक : रुग्णांना जीवनदान देणारे डॉक्टर आणि समाजाचे सदैव रक्षण करणारे पोलीस दल हे दोघेही एकाच नावाचे प्रवासी आहेत तर  दोघाचे काम समाजसेवेचे आहे. त्यामुळे समाजात वाढती हिंसकवृती रोखण्यासाठी या दोन्ही घटकांनी एकत्र येणे गरजेचे असून डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरजेचे असून यासाठी पोलीस आणि डॉक्टर या दोघांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे  असल्याचे मत नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केले आहे. द नाशिक ऑबस्टेरिक्ट अँड गायनोलॉजीकल सोसायटी यांच्या तर्फे आयोजित ‘मेडिको लीगल असपेक्ट ओबेजी’ अर्थात आरोग्य यंत्रणा आणि कायदेशीर तरतुदी या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी नांगरे पाटील पुढे म्हणाले की, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सुचवलेले काही सूचना अंमलात आणल्या पाहिजेत. सोबतच पोलिसांनी काय करावे याबाबद्दल देखील डॉक्टरांनी देखील सूचना सुचविल्या पाहिजेत. हॉस्पिटल सीसीटीव्ही हवेत, योग्य प्रकारे सुरक्षा यंत्रणा उपलब्ध असावी असेही त्यांनी सांगितले.

मेडिको लीगल कमिटीची स्थापना

अनेकदा रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईक यांच्याकडून डॉक्टरावर हल्ले होतात. याकडे पाहाता विशेष कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. याची घोषणा यावेळी करण्यात आली. यात डॉ. निवेदिता पवार, डॉ. अभय सुखात्मे, आणि डॉ. शोधन गोंदकर याचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मान्यवर तज्ज्ञांनी नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन, गर्भपाता संदर्भातला कायदा, रुग्ण सेवा देताना आवश्यक असलेल्या वेगवेगळ्या कायदेशीर परवानग्या, कायद्यातील तरतुदी, विविध कागदपत्रांची पूर्तता यावर मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियेची आधुनिक पद्धत आलेल्या लेप्रोस्कोपीवर डॉ चारूलता बापये यांनी  प्रकाश टाकला. तर समाजात वाढत असलेल्या आयुआय, आयवीएफ, सरोगसीने होणाऱ्या मातृत्वाच्या कायदेशीर गोष्टी डॉ मंजिरी वालसनकर यांनी स्पष्ट करून सांगितल्या. रुग्ण सेवा बजावतांना काही महत्वाचे कानमंत्र डॉ. किरण कुर्तकोटी यांनी दिला. अनेकदा डॉक्टरांना रुग्णासदर्भात कायदेशीर लढाई द्यावी लागते अशा काही केसेसचा आढावा डॉ मनीष मचावे यांनी घेतला. डॉ संतोष काकडे यांनी आरोग्य आणि कायदा यांचा एकमेकांशी असलेला संदर्भ स्पष्ट करून सांगितला.

निवृत्त पोलीस अधिकारी सध्या वकील व्यवसायात असणारे डॉ संजय अपरांती यांनी डॉक्टरानी रुग्णाशी निगडित असलेल्या कायदेशीर बाबी तपासायला हव्यात असे सांगत. रुग्णाची सुश्रुता केली जाते तेव्हा स्वच्छ अक्षरात , कोणतेही छोटे न समजणारे शब्द रिपोर्ट मध्ये लिहिणे टाळावे. सोबतच योग्य पद्धतीने रिपोर्ट लिहून त्यावर स्वाक्षरी आणि तारीख नक्की टाकावी , त्यामुळं कागद पत्रे योग्य अश्या समजणाऱ्या स्वरूपात ठेवावीत याचा उपयोग पोलीस तपासात होतो असे मत अपरांती यांनी व्यक्त केले.

यावेळी ऐनओ जिंएस अध्यक्षा डॉ. नलिनी बागुल, सचिव डॉ. उमेश मराठे, खजिनदार डॉ. निवेदिता पवार , डॉ. वर्षा लहाडे, डॉ. गीतेंद्र शर्मा, डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर आदीं मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ. रविराज खैरनार, डॉ. गौरी करंदीकर यांनी केले. 

 

डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधायला हवा : किरण अग्रवाल

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात दैनिक लोकमत चे संपादक किरण अग्रवाल यांनी मिडीया इन मेडीसीन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, बातम्यांची वर्गवारी दोन प्रकारात होते. डॉक्टरांनी माध्यमांतील बदनामी कशी रोखता येईल हे पहिले पाहिजे. माध्यमे सुद्धा डॉक्टर कडे एक योग्य व्यक्ती म्हणून पाहतो.  डॉक्टर सेवा भाव देतात , जेव्हा कोणत्या प्रकरणात जेव्हा डॉक्टर यांचे नाव तेव्हा चर्चेचा विषय होतो. जेव्हा माध्यमनापासून दूर राहत तेव्हा प्रॉब्लेम होतो. जिथे शंका निर्माण होते तेथे बातमी असते, माध्यमांना संपूर्ण सांगा की घटना काय आहे. त्यामुळे बदनामीला सामोरे जावे लागणार नाहीत. दैनिकात अनेक  चांगल्या बाबी छापल्आया जातात.  मेडिकल जर्नालिझम उद्ययास येत आहे. तुम्ही नक्की चांगल्या बातम्या नक्की माध्यमांना द्या. माध्यमांना जर तुम्ही योग्य माहिती दिली नाही तर ते योग्य नाही. समाजाला तुमच्या क्षेत्रातील आद्यवत माहिती दिली पाहिजे.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News