नाशिक दि.30 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी, हितचिंतकांनी मुद्रणालयाच्या सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकांनी नमुना मतपत्रिका छापण्यास जिल्हादंडाधिकारी, सूरज मांढरे यांनी नाशिक (ग्रामीण) जिल्हयात 24 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये उमेदवाराचे नांव व त्यांना नेमुन देण्यात आलेली चिन्हे छापणे, नमुना पत्रिकेसाठी मा.भारत निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, मा.भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे यावर नाशिक ग्रामीण जिल्हयात निर्बंध घातले आहेत. सदर आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




