शासकीय व निमशासकीय कार्यालयात आवारात निवडणूक प्रचारास प्रतिबंध

Sep 30, 2019

नाशिक दि.30 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. सदर निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व निवडणुक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शासकीय व निमशासकीय कार्यालये, शासकीय व निमशासकीय विश्रामगृहे यांचे आवारामध्ये निवडणूक प्रचारास जिल्हादंडाधिकारी, सूरज मांढरे यांनी नाशिक (ग्रामीण) जिल्हयात 27 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1973 चे कलम 144 (1) (2) अन्वये प्रतिबंध घातले आहेत. नाशिक ग्रामीण जिल्हयातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व विश्रामगृहे यांचे आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने , निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी व हितचिंतकांनी सभा घेणे, रॅली काढणे, निवडणूकी संदर्भात पोस्टर्स, बॅनर्स पॅम्प्लेटस, कटआऊटस, होर्डिंग लावणे तसेच निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदारांना प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे किंवा राजकीय कामासाठी सदर आवाराचा वापर करणे या बाबींवर निर्बंध घालत आहेत. सदर आदेशाचा भंग करण्याऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल.

अजून बातम्या वाचा..

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या  नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा

Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...

read more
व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

व्यावसायिक प्रदर्शने: मानव, पर्यावरण आणि प्रगतीला चालना देणारे प्रभावी व्यासपीठ

नाशिक : प्रदर्शन उद्योगामध्ये कार्यरत विविध स्थानिक संस्था आणि आयोजकांनी ‘जागतिक प्रदर्शन दिन...

read more
एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

एचसीजी मानवता कॅन्‍सर सेंटरचा पुढाकाराने ‘ASCO Direct GI Cancers’ चे यशस्‍वी आयोजन

नाशिक: भारतातील आरोग्य क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत, नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर...

read more
” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

” सागरा प्राण तळमळला…” या अजरामर काव्याला ११५ हून अधिक वर्षे झाल्यानिमित्त अंदमानात देशभक्तीचा भव्य सोहळा!

नाशिक : "सागरा प्राण तळमळला..." या अमर ओळींनी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत चेतवली...

read more

तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची ३ ऑगस्ट रोजी शेगाव येथे राज्यस्तरीय बैठक

Nashik : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवार, (दि. ३,...

read more
Breaking News