नाशिक दि.1 – जिल्ह्यातील 15 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी विविध ठिकाणांहून प्राप्त झालेल्या बॅलेट व कंट्रोल युनिट, व्हिव्हिपॅट या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळ येथे पूर्ण करण्यात आली.
यावेळी अंबड वेअर हाऊस येथे झालेल्या प्रथम सरमिसळ प्रक्रियेसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कुंदनकुमार सोनवणे, मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी मनोज घोडे पाटील, उपायुक्त महानगरपालिका, तहसिलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या EMS (EVM Mangement System) यामध्ये सर्व प्रकारच्या EVM आणि VVPATs नोंद घेवुन मतदार संघनिहाय वितरीत करण्यात येते. सदर प्रणाली ही अत्यंत अचुक व पारदर्शक तत्वावर निर्माण करण्यात आली आहे. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हिव्हिपॅट यंत्रे हे 20 व 30 टक्के अधिक प्रमाणात संबधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरीत करण्यात आली आहेत. संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने सरमिसळ प्रक्रियेची पहिली फेरी पुर्ण करण्यात आल्याची सविस्तर माहिती श्री. मांढरे यांनी दिली.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन व व्हिव्हिपॅट यंत्राबाबतच्या सर्व शंकांचे निरसन करुन संपूर्ण मतदान प्रक्रिया समजुन घेण्याचे आवाहन केले. सरमिसळ प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघ निहाय यंत्रांचे वाटप होणार आहे. व्हिव्हिपॅट यंत्र वाहतुक करतांना अत्यंत काळजीपूर्वक हाताळणे आवश्यक आहे. तसेच मतदान केंद्रांपर्यंत व्हिव्हिपॅट मशीन नेतांना ते ट्रान्सपोर्ट मोडमध्ये असणे गरजेचे असल्याचेही सांगितले. विधानसभा मतदारसंघ निहाय 15 मतदारसंघात 4579 मतदान केंद्रांना प्रत्येकी 5501 बॅलेट व कंट्रोल युनिट आणि 5961 व्हिव्हिपॅट यंत्रांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती श्री.सोनवणे यांनी दिली. यावेळी जिल्हयातील सर्व नायब तहसिलदार व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्व कर्मचारी उपस्थित होते.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





