महात्मा गांधीजी यांना १५०व्या जयंतीनिमित्त मानवंदना म्हणून महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) आठवडाभर फेस्टिवल ऑफ गिव्हिंग दानउत्सव साजरा करणार आहे. गांधी जयंतीला या उत्सवाची सुरूवात होऊन २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०१९ दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील १००० गावांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारे मिशन व्हीएसटीएफ महाराष्ट्राच्या २५ जिल्ह्यांमध्ये दानउत्सव साजरा करेल. यामध्ये महाराष्ट्रातील ८७ हून अधिक तालुके व ३२३ ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे. या सेलिब्रेशन मोहिमेला २ ऑक्टोबरपासून सुरूवात होईल आणि ८ ऑक्टोबर रोजी समापन होईल. या मोहिमेमध्ये स्वच्छता, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य व शासन अशा विविध कृतींचा समावेश असणार आहे. विविध कार्यक्षेत्रांमधील कॉर्पोरेट्स, कंपन्या, परोपकारी संस्था, व्यावसायिक लीडर्स, स्थानिक अधिकारी व संस्था अशा विविध भागधारकांचा सहभाग व सहयोग वाढवण्याला प्रोत्साहन देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ऑटोरिक्षा ड्रायव्हर्स ते मुख्य कार्यकारी अधिकारी, शालेय विद्यार्थी ते सेलिब्रिटी असे ६ दशलक्षांहून अधिक लोक महात्मा गांधीजी यांना मानवंदना म्हणून दानउत्सवाच्या आठवड्यादरम्यान समाजाचे ऋण म्हणून त्यांचा वेळ, पैसा, संसाधने किंवा कौशल्ये दान स्वरूपात देतात.
यापूर्वी यापैकी अनेक कृती शहरांमध्ये राबवण्यात आल्या आहेत. पण यंदा एमव्हीएसटीएफसह लोकांना मोठ्या संख्येने येऊन या थोर कार्यासाठी गावक-यांसह खाद्यांला खांदा लावून काम करण्याची अनोखी संधी आहे. तसेच स्वयंसेवक उपक्रमाच्या सादरीकरणाची घोषणा करत एमव्हीएसटीएफने शहरी व ग्रामीण भागांमधील संस्था व लोकांना परिवर्तनसाथी बनण्याचे आणि गावाच्या सामाजिक विकासासाठी गावक-यांसोबत सक्रियपणे सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. परिवर्तनसाथी बनण्यासाठी (volunteer@mvstf.org) येथे स्वयंसेवक म्हणून नाव, संपर्क क्रमांक आणि जिल्हा व पसंतीचे गाव अशी माहिती मेल करावी. नोंदणीकरिता अंतिम तारीख १ ऑक्टोबर २०१९ मध्यरात्रीपर्यंत आहे.
संस्था व स्वयंसेवकांनी अगोदरच पुढाकार घेतला आहे. ते जिल्हा परिषद शाळांचे सुशोभिकरण, शिक्षण प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन, विद्यार्थ्यांसाठी अध्ययन कार्यशाळांचे आयोजन, ग्रामीण भागांच्या आर्थिक साक्षरतेसंदर्भात काम, गावांमध्ये स्वच्छता मोहिमा अशा उपक्रमांशी कटिबद्ध आहेत.
आतापर्यंत १०० हून अधिक शहरे व नगरे आणि शेकडो गावांमध्ये दानउत्सवादरम्यान २,००० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोक या उपक्रमामध्ये करोडो पैसा व संसाधनांचे दान करण्यासह लाखो तासांपर्यंत स्वयंसेवा करतात. आठवडाभर चालणा-या या मोहिमेचे नेतृत्व संबंधित गावांमधील मुख्यमंत्री ग्रामीण विकास सहकारी (सीएमआरडीएफ) करणार आहेत. सीएमआरडीएफ, गावकरी, गावातील अधिकारी व जिल्हा प्रशासनाच्या सहभागाची खात्री घेतील. ‘फेस्टिवल ऑफ गिव्हिंग‘ आठवडा विविध सामाजिक विकास थीम्स राबवण्यामध्ये सक्रिय समुदाय सहभागाला चालना देण्याचा मनसुबा ठेवतो. या मोहिमेमध्ये खालील सामाजिक विकास थीम्सचा समावेश असेल.
स्वच्छता: गावांना १०० टक्के स्वच्छ करण्याच्या दिशेने पाऊल
एकदाच वापर होणा-या प्लास्टिकपासून गावाची मुक्तता
प्रत्येक घरामध्ये शोष खड्डे
प्रत्येक घरामध्ये शौचालये आणि वापरासंदर्भात मूल्यांकन
प्रत्येक संस्थेची शालेय इमारत, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, इमारतींमध्ये शौचालये
प्रत्येक गावामध्ये कंपोस्ट
कच-याचे विभाजन आणि वेगळा केलेला कचरा गोळा करणे
महिला सक्षमीकरण
गावामध्ये राहणा-या सर्व इच्छुक महिलांचे बँक खाती असण्याची खात्री घेणे
गावामध्ये राहणा-या सर्व इच्छुक महिला स्वयं-सहाय्यता गटाशी संलग्न असण्याची खात्री घेणे
एसएचजी सदस्यांच्या सल्ल्याने कागदपत्र व्यवहारासंदर्भातील त्रुटी दूर करणे आणि एसएचजींसाठी उत्पन्न निर्मितीची संभाव्य संधी जाणून घेणे
शिक्षण
प्रत्येक शाळेतील गाव प्राथमिक शाळेमधील मुलांच्या अध्ययनाच्या गरजा जाणून घेणे (वाचन, लेखन, गणित, व्यापक कौशल्ये इत्यादी)
या मूल्यांकनामध्ये सादर करण्यात आलेल्या अध्ययन गरजांच्या आधारावर रेमीडियल वर्गांचे आयोजन. रेमीडियन वर्गांनंतर प्रगती जाणून घेण्यासाठी दर महिन्याला मूल्यांकन चाचणीचे आयोजन
गावस्तरीय अध्ययन देवाणघेवाण उपक्रम तयार करणे: गावातील मुले व तरूणांसाठी गावामधीलच शिक्षित/ कौशल्यपूर्ण तरूणांनी पुढाकार घेऊन एका विषयाचे अध्ययन करावे आणि अध्ययन/ कौशल्ये सत्रांचे आयोजन करावे.
इतर थीम्स
वरील थीम्सव्यतिरिक्त सहभाग वाढवण्यासाठी काही इतर थीम्स पुढीलप्रमाणे:
वृक्ष व बियाणे रोपण
शाळेचे सुशोभिकरण
चित्रपट/ माहितीपट दाखवणे व चर्चा
सांस्कृतिक कार्यक्रम – अभिनय, नृत्य, गाणी
गाव, सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहिमा
मासिकपाळी स्वच्छता जागरूकता मोहिम
जलीय संस्थांची स्वच्छता
स्थानिक तरूणांसाठी क्रीडा प्रशिक्षण
महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन:
२०१७ मध्ये महाराष्ट्रात १००० आदर्श गावे निर्माण करण्याच्या एकमेव हेतूसह महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) या ना-नफा तत्त्वावर असलेल्या संस्थेची स्थापना करण्यात आली. एमव्हीएसटीएफ राष्ट्रनिर्मितीमध्ये उच्चस्तरीय सार्वजनिक-खाजगी सहयोगाची हमी देते. फाऊंडेशन महाराष्ट्राच्या गावांमध्ये सर्वांगीण परिवर्तनाचा दृष्टिकोन ठेवते. याद्वारे विविध विकासात्मक ध्येये संपादित करण्यात येतील. ज्यामध्ये डिजिटल कनेक्टिव्हीटी, पक्की घरे, जल सुरक्षितता, कौशल्य प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षण, सुधारित कृषी उत्पादकता, शिक्षण व अध्ययन निष्पत्ती, आरोग्य व स्वच्छता यांचा समावेश आहे. एमव्हीएसटीएफ महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील ४५३ गावांमध्ये उपस्थित आहे.
दानउत्सव बाबत:
दानउत्सव (पूर्वीचा जॉय ऑफ गिव्हिंग वीक) हा भारताचा ‘फेस्टिवल ऑफ गिव्हिंग‘ आहे. २००९ मध्ये सुरू करण्यात आलेला हा फेस्टिवल दरवर्षी गांधी जयंतीनिमित्त २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान साजरा केला जातो. जगभरातील विविध लोक एकत्र येत समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतात. #DaanUtsav! साठी कोणा एकालाच श्रेय देणे अशक्य आहे. नोव्हेंबर २००८ ते फेब्रुवारी २००९ दरम्यान विविध व्यक्ती आणि एनजीओ लीडर्सनी पुढाकार घेऊन ‘इंडिया गिव्हिंग वीक‘ सुरू करण्याचे ठरवले




