नाशिक : निलवसंत मेडीकल फाउंडेशन ॲण्ड रिसर्च सेंटर ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कै.आ.डॉ.वसंतराव पवार यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनातून कार्यरत आहे.संस्थेच्या स्थापने पासून नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असून आता पर्यंत संस्थेने अनेक विविध कार्य केले आहे.ज्यात 3 लाख 75 हजार पर्यंत मोफत आरोग्य शिबीर, 38 हजार 355 मोतिबिंदू शस्त्रक्रिया, 280 शौचालय बांधकामे बांधणे व त्याबाबत वापराची जनजागृती, जलवसंत प्रकल्प योजने अंतर्गत 12 गांवाना आरओ मशिन वाटप आदि कार्य केले आहे.
संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि नाशिक जिल्हयाचे समाजाभिमूख,बहुआयामी व्यक्तीमत्व कै.डॉ.वसंतराव पवार यांच्या स्मृतीदिना निमित्त संस्थेतर्फे योगदान सोहळयाचे आयोजन सोमवार दि 7 ऑक्टोबर 2019 रोजी सायं 5 वा रावसाहेब थोरात हॉल गंगापूर रोड नाशिक येथे करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत संस्थेच्या पदाधिका-यांनी दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्राची पवार, विजय कोठारी, रविंद्र मणियार, नारायणराव थेटे, आदि उपस्थित होते.
डॉ.वसंतराव पवार स्मृती पुरस्कार सन 2012 पासून जाहिर करण्यात येतो. दरवर्षी हया पुरस्काराने शिक्षण, वैदयकिय, सामाजिक, पैकी एका क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणा-या व्यक्तींना सन्मानिक केले जाते. सदर पुरस्काराचे स्वरुप मानपत्र, सन्मान चिन्ह व रक्कम रुपये एक लाख रुपयाचा धनादेश असे आहे.
सन 2019 या वर्षीचा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रासाठी नर्मदालयाच्या माध्यमातून लेपा येथील आदिवासी मुलांसाठी काम करणा-या श्रीमती भारतीताई ठाकूर यांना मंत्री श्री.शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत पाहुणे म्हणून विनायकदादा पाटील, बाळासाहेब वाघ, श्रीमती निलिमाताई पवार आदि उपस्थित राहणार आहे.या पुरस्कार वितरण सोहळयास जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजनकांनी केले आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





