नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 123 नाशिक पूर्व व 124 नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणुन रणजितकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9405308529 असुन उपरोक्त दोन्ही मतदार संघातील नागरिकांच्या समस्या समक्ष जाणून घेण्याकरीता किंवा तक्रार ऐकून घेण्याकरिता सकाळी 9 ते 10 या कालावधीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक सुट क्रमांक 1 या ठिकाणी उपलब्ध राहतील. वरील भ्रमणध्वनीवर संपर्क SMS/Whatsapp वर तक्रारीची दखल घेण्यासाठी कायम उपलब्ध राहतील तरी नागरिकांनी त्यांच्या तक्रारींचे निरसन करुन घेण्याचे आवाहन 123 नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक यांनी केले आहे.
नाशिकमध्ये ‘ISNWZ 2026’ परिषदेचा दिमाखदार शुभारंभ
देशभरातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रीनल पॅथॉलॉजी, नेफ्रो क्रिटिकल केअर आणि वैज्ञानिक सत्रांचे...





