नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 113 नांदगांव व 114 मालेगांव (मध्य) या मतदारसंघासाठी एम. रामा राव यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघातील नागरिकांना निवडणूक संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक यांना 7820908507 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन तक्रार करु शकतात.
115 मालेगांव (बाह्य) व 116 बागलाण या मतदारसंघासाठी प्रसन्नकुमार जेना यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदार संघातील नागरिकांना निवडणूक संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक यांना 9921129033 या भ्रमणध्वनीवर तसेच 02554-256601 या क्रमांकावर संपर्क साधुन किंवा मालेगांव येथील शासकीय विश्रामगृह (सिंहगड) येथे दुपारी 4 ते 5 या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार करु शकतात.
117 येवला व 118 चांदवड या मतदारसंघासाठी श्रीमती तेन्जींग डोलकर यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदारसंघातील नागरिकांना निवडणूक संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक यांना 7821887501 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन तक्रार करु शकतात. तसेच मतदारसंघाच्या समस्या समक्ष जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह, चांदवड येथे सकाळी 9 ते 10 या ठिकाणी उपलब्ध राहतील.
119 येवला व 120 सिन्नर या मतदारसंघासाठी बी.एच.तलाठी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदार संघातील नागरिकांना निवडणूक संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक यांना 7820861671 या भ्रमणध्वनीवर तसेच bipintalati23761@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधुन तक्रार करु शकतात. 121 निफाड, 122 दिंडोरी, 123 नाशिक (पूर्व) व 124 नाशिक (मध्य) या मतदारसंघासाठी रणजितकुमार यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदार संघातील नागरिकांना निवडणूक संदर्भात काही तक्रार असल्यास निवडणूक निरीक्षक यांना 9405308529 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन तक्रार करु शकतात.
125- नाशिक (पश्चिम), 126 देवळाली (अ.जा.) व 127 इगतपुरी (अ.ज.) मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणुन व्यंकटेशपती एस. (संपर्क क्र. 9665201604) यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीबाबत नागरिकांची तक्रार असल्यास त्यांनी निवडणूक निरीक्षक यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तक्रार करु शकतात असे, निवडणूक शाखेने यांनी कळविले आहे.
126- देवळाली व 127-इगतपुरी मतदारासंघासाठी अशोक खन्ना यांची खर्च निरिक्षक म्हणुन नियुक्ती झाली आहे. निवडणूकीच्या खर्चाबाबत नागरिकांची काही तक्रार असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक 8275507454 वर संपर्क साधुन तक्रार करावी.
122-दिंडोरी मतदारसंघासाठी वि. के. त्रिपाठी यांची खर्च निरिक्षक म्हणुन नियुक्ती झाली आहे. निवडणूकीच्या खर्चाबाबत नागरिकांची काही तक्रार असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक 7821005539 वर संपर्क साधुन तक्रार करावी, असे निवडणुक शाखेने कळविले आहे.
—-
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...





